बजरंगीसाठी आता 'भाईजान'चा आवाज!
मुंबई: देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह आहे. त्याच निमित्ताने आगामी अॅनिमेशन सिनेमा ‘हनुमान द दमदार’चं पोस्टर रिलीज होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे या अॅनिमेशनपटात हनुमाच्या पात्राचा आवाज हा ‘बजरंगी भाईजान’ अर्थात खुद्द सलमान खानने दिला आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन रुची नारायण यांनी केलं आहे. रुची यांनी यापूर्वी ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’चं लेखन केलं आहे, तर कल, यस्टर्डे आणि टुमारो या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘हनुमान द दमदार’ हा सिनेमा 19 मे रोजी रिलीज होणार आहे. नावावरुनच हा सिनेमा हनुमानावर आधारित असल्याचं समजतं.
प्रभू रामाला भेटण्यापूर्वी हनुमान कसा होता, त्याची शक्ती, त्याचं ध्येय, त्याचं जीवन कसं होतं, हे या सिनेमात पाहायला मिळेल.
“या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यासाठी
‘हनुमान जयंती’पेक्षा वेगळा मुहूर्त असू शकत नाही.
हनुमानाच्या आशिर्वादाने हा उन्हाळा न
क्की दमदार असेल असा विश्वास आहे”, असं रुची नारायण यांनी म्हटलं आहे.
Source ABP Maaza
No comments:
Post a Comment