जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत मेहबुबा है अपने साथ लेकर जायेगी...
'मुकद्दर का सिकंदर' पाहताना विनोदखन्नाचा एक वेगळा लुक आणि वेगळी टशन चित्रपटभर जाणवत राहते. सोफेस्टीकेटेड वाटतो तो. गोरीगोमटी गोजिरवाणी निष्पाप मेमसाब (राखी) आणि तिच्या शोधात आयुष्य घालवलेला दिलदार सिकंदर(अमिताभ) यांच्या कात्रीत अडकलेला विनोदखन्नाचा विशाल आनंद काही केल्या डोक्यातून जात नाही. क्लायमॅक्सला मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या दिलावरच्या (अमजदखान) हातून सिकंदर जबर घायाळ होतो. विशालच्या मांडीवर डोकं टेकून आणि मेमसाबची अंधुक होत जाणारी छबी डोळ्यात साठवत तो अखेरचे श्वास मोजत असतो. आपली अंतिम इच्छा म्हणून तो विशालला त्याचे ते मुशाफिरीचे गाणं गायला सांगतो. विशाल ते गाणं म्हणतो पण त्यातल्या ओळी काळीज घायाळ करून जातात. काही वेळापूर्वी विनोद गेल्याचे समजले आणि डोळ्यात पाणी आणून ह्या पंक्ती गाणारा विनोदने साकारलेला विशाल डोळ्यापुढे आला, माझ्या डोळ्याच्या कडा ओलावून गेला...
अलविदा मेरे दोस्त ....
हर ताज़ा अपडेट पाने के लिए के फ़ेसबुक पेज को लाइक करें।
No comments:
Post a Comment